आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ओटीपी विचारून दोन लाख 93 हजारांना घातला गंडा

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यासाठी तुळशीराम मोतीराम गंगणे (रा. जलालपूर रोड, समतानगर, जिरेवाडी, ता. परळी) यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून बोलणाऱ्या भामट्याने विश्वासात घेतले. त्याच्यावर विश्वास ठेवत ओटीपी सांगितला अन् गंगणेंना तब्बल २ लाख ९३ हजारांची रक्कम गमावून बसावी लागली.

२२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गंगनेंना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. आयसीआयसी बँकेच्या मुंबई शाखेतून बोलत असल्याचे त्याने सांगितले. तुम्हाला क्रेडिट कार्ड सुविधा सुरू करण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठीचा हा कॉल आहे. तुमच्या मोबाइलवर ओटीपी आला आहे तो कळवा असे संबंधिताने सांगितले. यादरम्यान गंगणेंनी सदरील मोबाईल क्रमांकाची खात्री करण्यासाठी ट्रू कॉलरवरून खातरजमा केली असता ताे क्रमांक आयसीआयसीआय बँकेचा असल्याचे त्यांना वाटले. नंतर त्यांनी सीव्हीसी व ओटीपी क्रमांक संबंधिताला कळवले होते. अज्ञाताविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...