आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्यू:दोन अपघातात दाेन जणांचा झाला मृत्यू

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यात दोन अपघातात जखमी झालेल्या दोघांचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सत्यवान माधव पवार (७० रा. आहेर वडगाव) हे रविवारी दुपारी पाली येथे असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी पायी जात होते.

यावेळी त्यांना भरधाव कारने (एम एच २५, आर.२८६१) धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुसऱ्या घटनेत मोरगाव (ता. बीड) येथील दिलीप कागदे हे तुळजापूर येथे जात असताना त्यांना चौसाळ्याजवळ वाहनाने धडक दिली. यात ते जखमी झाले होते. सोमवारी सकाळी त्यांचा उपचादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...