आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तरुणाच्या सुटकेसाठी गेलेल्या‎ दोन पोलिसांना केली मारहाण‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीयरबारसमोर एका तरुणाला मारहाण सुरू‎ असताना त्याच्या सुटकेसाठी गस्ती वरील दोन‎ पोलिस सरसावले; मात्र त्याचवेळी तरुणाला‎ मारहाण करणाऱ्या तिघांनी पोलिस कर्मचाऱ्यांना‎ धक्काबुक्की करत मारहाण करून शासकीय‎ कामकाजात अडथळा आणला. गुरूवारी दि. २ मार्च‎ रोजी रात्री शहरानजीक च्या जिरे वाडी शिवारातील‎ एका बीयरबारसमोर ही घटना घडली. तिघांविरुद्ध‎ ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला.‎ या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात कार्यरत पोलिस‎ कर्मचारी कृष्णा उत्तमराव बडे यांनी तक्रार नोंदवली.‎ ते व अनिल घाटमाळ हे पोलिस वाहनातून (क्र.‎ एम. एच.२३. ए. ए.००६२) २ मार्च रोजी रात्री उशिरा‎ गस्तीवर होते.‎ जिरेवाडी शिवारात जालना रोडवरील एका‎ बियरबारसमोर काही जण साहेबराव तुलसी राम‎ सावते (रा.गयानगर, बीड ) याला संगनमत करून‎ मारहाण करत असल्याचे दिसले.त्यानंतर तत्काळ‎ दोन्ही कर्मचारी तेथे पोहोचले.

त्यांनी मारहाण‎ करणाऱ्या तिघांना ''तुम्ही त्याला मारहाण कशाला‎ करता? तुमची काही तक्रार असेल तर पोलिस‎ ठाण्याला द्या असे सांगितले; मात्र त्यांचे न ऐकता‎ उलट आरोपींनी पोलिस कर्मचारी बडे व घाटमाळ‎ यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून‎ धक्काबुक्की करत मारहाण केली. आरोपी‎ एवढयावरच थांबले नाही तर त्यांनी दोन पोलिसांना‎ शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्याही‎ दिल्या. या प्रकरणी सुनील मोहिते, शुभम सुनील‎ मोहिते व अन्य एक यांच्याविरुध्द बीड ग्रामीण‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.‎

बातम्या आणखी आहेत...