आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या नातेवाइकांकडे लग्नासाठी आलेल्या दोन शाळकरी मुलांचा पैठणच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील भगवाननगरजवळ बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. शेख अरबाज (१३, रा. पैठण ) व शेख नासेर ( १२, रा.रामपुरी, ता. गेवराई) अशी मृत मुलांची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील गुळजजवळील भगवाननगर येथील आपल्या मामेबहिणीच्या विवाहासाठी ही दोन्ही मुले आपल्या कुटुंबासह बुधवारी आली होती. बुधवारी विवाह सोहळा पार पडल्यानंतर मुले नातेवाइकांच्या शेतात गेल्यानंतर पैठणच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात दोन्ही मुले वाहून गेली.
बुधवारी रात्री दहा वाजता शेख अरबाज या बालकाचा मृतदेह गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारात आढळून आला, तर शेख नासेर याचा मृतदेह गुरुवारी दुपारी दीड वाजता कालव्यापासून तीन किलोमीटर अंतरावर सापडला. दोन्ही मुलांवर त्यांच्या पैठण व रामपुरी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.