आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई:दोन सख्या बहिणींचा गोदावरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; राक्षसभुवन शनीचे येथील घटना

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेहा धर्मराज कोरडे (वय ९ वर्ष) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले. तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

या बाबद सविस्तर माहिती अशी की, राक्षसभुवन या ठिकाणच्या गोदापात्रात नेहमी प्रमाने कपडे धुन्यासाठी या दोन सख्या बहिनी गेल्या होत्या. पाण्यात पाय घसरून दोन्ही मुली पाण्यात पडल्या आणि गोदापात्रातील वाळुच्या मोठ्या खड्याने या दोन्ही बहिनीचा अंत झाला आहे. परिसरात या घटनेने खळबळ माजली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...