आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती:पाटोदा माध्यमिक विद्यालयातील दोन‎ विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील आदर्श शिक्षण संस्था बीड‎ द्वारा संचालित पाटोदा माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालय बेल खंडी पाटोदा या‎ विद्यालयाचा करण विष्णू कळसुले ग्रीकोरोमन‎ कुस्ती स्पर्धेत ७१ किलो वजनी गटात, तर‎ ऋषिकेश सतीश नेहराळे ५७ किलो वजनी गटात‎ फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात जिल्ह्यातून प्रथम‎ आले. विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड‎ झाली आहे.

पाटोदा बेल खंडी माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालयात हे दोन्ही विद्यार्थी शिक्षण‎ घेत आहेत त्यांनी संपादन केलेल्या यशाने आदर्श‎ शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त क्षीरसागर,‎ प्रशासकीय अधिकारी प्रा.डाॅ. राजू मचाले,‎ कार्यवाह एम. एन. राऊत, प्राचार्य धनवंत मस्के,‎ क्रीडा शिक्षक अरुण खाडे यांच्यासह शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी,‎ पालक, ग्रामस्थांनी या दोघांचे स्वागत केले.‎

बातम्या आणखी आहेत...