आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरी:दोन दुचाकी चोरांच्या केज पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते. मात्र एका घटनेत मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ताब्यात घेतलेल्या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे तर एक आरोपी फरार आहे.

बुधवारी बीड येथील मेहबुबखान अमित खान पठाण हे त्यांची पॅशन प्रो-मोटार सायकल क्र. (एम एच-२३/बी-१३३६)वरून बीड कडे जात असताना ते केज येथील बस स्टँडवर अनिल भोजनालयात थांबले होते. त्यांनी मोटारसायकल अनिल भोजनालयासमोर उभी केली. जेवणानंतर ते बाहेर आले असता त्यांची मोटारसायकल तेथे नसल्याचे आढळले.ते पोलिस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना वाटेत तीन व्यक्तिंनी गाठून मोटार सायकल आम्ही शोधून देतो त्यासाठी ५ हजार रुपये द्या अन्यथा मारून टाकू अशा धमक्या देत पैशाची मागणी केली.

सदर तीन इसम हे महेबूबखान पठाण यांना पोलिस स्टेशनसमोर धमक्या देऊन पैशाची मागणी करीत चोरीची तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे पथक परिसरात ते दबा धरून बसले. यावेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करून अरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला त्यांच्यावर झडप घालून दाेघांंच्या मुसक्या आवळल्या.

चोरीला गेलेली मोटारसायकल दीड तासात ताब्यात
चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवितात त्यांनी चोरी केलेली मोटार सायकल पोलिसांच्या ताब्यात दिली. चोरीला गेलेली मोटार सायकल केज पोलिसांनी अवघ्या दीड तासात ताब्यात घेत दोघांना चोरांना जेरबंद केले आहे. याप्रकरणी महेबूबखान पठाण यांच्या तक्रारीवरून अरबाज नसीर खुरेशी, रईस हारुन मुल्ला, पाप्या उर्फ जुबेर मुश्ताक फारोकी (सर्व रा. केज) यांच्या विरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...