आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार, तर आठ जण जखमी

बीड/केज2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माजलगाव व केज तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार, तर आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये माजलगाव येथील शिक्षकांचा समावेश आहे. शिंदेवाडी (ता. माजलगाव) येथील सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव (३५), लक्ष्मण भीमराव विघ्ने (४५), ईश्वर सिद्धेश्वर जाधव (१०) हे नातेवाइकांची विचारपूस करून गावाकडे दुचाकीने परतत होते. या वेळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना माजलगावहून तेलगावकडे जाणाऱ्या कारने (एमएच ४४ एस ३२०३) दुचाकीला शिंदेवाडी फाट्यावर जोराची धडक दिली. यात सिद्धेश्वर जाधव व लक्ष्मण विघ्ने यांचा जागीच मृत्यू झाला, तर दहा वर्षांचा ईश्वर जाधव हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले. अपघातानंतर कार रस्त्यालगत खड्ड्यात जाऊन आदळली. कारमधील नामदेव हेडे (४४), परमेश्वर खेमाजी पवार (४५), प्रीती विनोद पोखरकर (३५), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकूर (३७), ज्योती शंकर कदम हे जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दुसऱ्या घटनेत कारला दुचाकी धडकल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. ही घटना केज-कळंब रस्त्यावरील साळेगाव येथील शंकर विद्यालयाजवळ १८ मार्चला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. कार (एमएच ०४ एफ ४९५५) ही केज-कळंब रस्त्याने जात होती. साळेगाव येथील शंकर विद्यालयाजवळ पश्चिमेकडून शेतरस्त्याने येत असलेल्या दुचाकीच्या (एमएच २५/९५४९) चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी ही चालत्या कारला जाऊन धडकली. दुचाकीवरील युनूस बागवान (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) व चंद्रकांत भालेराव (रा. माळेगाव, ता. केज) हे दोघे जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...