आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर, एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी बीड तालुक्यात अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर जाधववाडी फाट्यावर घडली. गणेश रामदास देवकर (४२, रा. नेहरुनगर, औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरुन त्याची ओळख पटली. ते सध्या पाटोदा तहसिल कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते.
बीड तालुक्यातील जाधववाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला अन्य एका दुचाकीने धडक दिली. या अपघातात देवकर हे जागीच गतप्राण झाले. दरम्यान, मृतासह जखमीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले होते. नेकनूर ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.