आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:मंगल कार्यालयासमोरून दुचाकी लंपास; दुचाकी चोरास पोलिसांनी पाठलाग करून पकडले

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मंगल कार्यालयासमोरून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास माजलगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ५ जून रोजी शहरातील आझादनगर भागात ही कारवाई करण्यात आली. सोहेल गुलाब शेख (२१, रा. आझादनगर, हमु. केसापुरी कॅम्प, माजलगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. ३ जून रोजी शहरातील एका मंगल कार्यालयाच्या आवारातून शेख मोहसीन युसूफ यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ४४ एन ५४८४) चोरट्यांनी पळवली होती.

याप्रकरणी ५ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तो आझादनगर येथे चोरीच्या दुचाकीसह असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार बालाजी मुळे यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यास पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

दोन साथीदारांचा शोध सुरू आरोपी सोहेल शेख यास ६ रोजी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. ते फरार असून त्यांचाही पोलिसांनी शोध सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...