आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वडवणी जवळील दुचाकी-पीकअपचा अपघात, चिखलबीडचे सरपंच दादासाहेब मुंडे अपघातात ठार

वडवणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडवणीजवळील हॉटेल अस्मिता जवळील परळी- बीड राज्य महामार्गावर हा अपघात घडला

वडवणीजवळ पीकअपने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चिखलबीड येथील सरपंच विलास उर्फ दादासाहेब मुंडे ( वय ३८ )हे ठार झाले. शनिवारी दुपारी तीन वाजता वडवणीजवळील हॉटेल अस्मिता जवळील परळी- बीड राज्य महामार्गावर हा अपघात घडला असुन त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील चिखलबीडचे सरपंच विलास उर्फ दादासाहेब मुंडे हे शनिवारी दुपारी तीन वाजता बीडहुन दुचाकी (एम.एच.४४,पी- ६१६५ )वरून वडवणीकडे निघाले होते. त्यांची दुचाकी वडवणी जवळील हॉटेल अस्मिता येथे आली असता माजलगाव येथुन बीडकडे निघालेल्या ( क्रमांक एम.एच.४४,यु-१०७९) पीकअपने दुचाकीला परळी- बीड राज्य महामार्गावर समोरा समोर धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की सरपंच विलास उर्फ दादासाहेब मुंडे हे पिक-अपच्या वर उडुन खाली रस्त्यावर आदळले. अपघातनंतर गंभीर जखमी असलेल्या मुंडे यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले अनिल वाघमारे (वय ३६ ) हेही किरकोळ जखमी झाले.मनमिळावू स्वभावामुळे मुंडे हे सर्वपरिचित असल्याने डोंगरपट्ट्यासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुले,दोन बहिणी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

चौपदरीकरण, रस्तादुभाजक करा
वडवणी शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्गा हा चढ-उतार व वळणाचा आहे.समोरून येणारी वाहने दुस-या वाहनचालकाला दिसत नाही.त्यामुळे या मार्गावर सतत अपघात होतात.या रस्त्याचे चौपदरीकरण, रस्ता दुभाजक,मुख्य चौकाच्या ठिकाणी मोकळी जागा सोडुन सर्व्हिस रोड तयार करुन वळणं काढुन टाकावीत तरच अपघाताची मालिका थांबेल.
संजय आंधळे, अध्यक्ष ,वडवणी तालुका सरपंच संघटना, वडवणी

बातम्या आणखी आहेत...