आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी लंपास:केज शहरातून दुचाकी लंपास, गुन्हा दाखल

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर दुचाकी लावून जेवण करून घरातून बाहेर येईपर्यंत अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना केज शहरात घडली. केज शहरातील स्वामी समर्थ मठ या भागातील गोविंद डिगांबर देशपांडे हे १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच. ४४ एफ. १५६३) घरासमोर लावून घरात जेवण करण्यासाठी गेले.

अर्ध्या तासाने जेवण करून परत घरातून बाहेर येईपर्यंत अज्ञात चोरट्याने पाळत ठेवत त्यांची ही २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. गोविंद देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...