आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी-सिरसाळा महामार्गावर राखेचा सडा:दोन महिलांनी टिप्पर अडवले; आधी चालकांना दिला चपलेचा प्रसाद, त्यानंतर रस्त्यावर पडलेली राख अंगातील शर्टांनी पुसायला लावली

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ

येथील औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची सध्या टिप्परचालक वाहतूक करत असून परळी-सिरसाळा मार्गावरील पांगरी कॅम्प गोपीनाथगडाजवळ गुरुवारी रात्री राख वाहतूक करणाऱ्या टिप्परमधून राख खाली पडल्याने रस्त्यावर थर साचला होता. हे पाहून घराच्या बाहेर सडा सारवणासाठी सकाळी उठलेल्या दोन महिलांनी संतप्त होऊन या मार्गावरून जाणारे टिप्पर अडवत चालकांना खाली उतरवून चक्क चपलेचा प्रसाद दिला. आमच्या घरासमोरील रस्त्यावर सांडलेली राख तुम्हीच साफ करा असे ठणकावून सांगत चालकांना अंगातील शर्ट काढून रस्त्यावरील राख पुसायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

वीज निर्मिती करणाऱ्या परळी येथील थर्मलमधून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडत असल्याने अधीच परळी शहरासह तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशी परिस्थिती असताना तालुका प्रशासन आणी पोलिस दुर्लक्ष करत आहेत. परळीच्या चारही बाजूचे मार्ग राखेने माखल्याने नागरिकांच्या नाकातोंडात राख जात आहे. परळी- सिरसाळा मार्गावरील गोपीनाथगडाजवळील पांगरी कॅम्प येथे गुरुवारी रात्रीच्या राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे रस्ते राखेने माखले होते. शुक्रवारी सकाळी दोन महिला जेव्हा झोपतून उठून घराच्या अंगणात सडा, सारवणासाठी गेल्या तेव्हा त्यांना अंगणात राखेच्या टिप्परच्या वाहतुकीमुळे राखेचा थर साचल्याचे दिसले. त्यामुळे दोन महिला थेट महामार्गावर उभ्या राहून राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवू लागल्या.

रस्त्यावर टिप्पर अडवूनही चालक टिप्परचालक दाद देत नसल्याचे पाहून महिला संतप्त झाल्या त्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या काही चालकांना बळजबरीने अडवत टिप्परच्या खाली उतरवून चांगलेच धारेवर धरले. टिप्परचालकांना अाधी चपलेचा प्रसाद दिला. आमच्या घरासमोरील रस्त्यावरील तुम्ही जी वाहतूक करून जी राख खाली पडली आहे ती अाधी साफ करा असे सुनावत चालकांना त्यांच्या अंगातील शर्ट काढून रस्त्यावर सांडलेली राख साफ करायला भाग पाडले. दोन महिला आक्रमक झाल्याचे पाहून पांगरी कॅम्पवरील अन्य ग्रामस्थही काही वेळात जमले. त्यांनी जवळपास तीन तास याच मार्गावर राख वाहतूक करणारे काही टिप्पर अडवले. पांगरी कॅम्प येथील ग्रामस्थांनी याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ
परळीजवळील राखेच्या तळ्यातून बेकायदेशीरपणे राखेची वाहतूक होत असून राखेचा साठा करणाऱ्या जमीन मालकांनी राखेच्या ढिगावर पाणी मारावे. ते ढिगारे ताडपत्रीने झाकावेतत. प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या टिप्परवर पर्यावरण संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश १९ मार्च २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी देऊनही राखेचे साठे ओले करून झाकण्याऐवजी अधिक प्रमाणात राख साठवली जात असून दिवसा राख वाहतूक केली जात आहे.
परळी शहरातून राखेचे टिप्पर वेगाने जात असल्याने रस्त्यावर टिप्पर मधून राख सांडून खच पडत आहे.बातम्या आणखी आहेत...