आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात खळबळ:केज शहरातून तीन बालकांसह दोन महिला बेपत्ता ; शोध घेण्याचा पोलिसांसमोर आव्हान

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील दोन वेगवेगळ्या भागातून तीन बालकांसह दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली असून सदरील घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.शहरातील शिक्षक कॉलनी भागातील अनिता युवराज कांबळे ही महिला तिच्या दिव्या व आशिष या दोन लेकरांसह २५ जुलै पासून बेपत्ता आहे. सदरील महिलेचा कुटुंबीयांनी शोध घेतला परंतु शोध न लागल्याने केज पोलिसांत खबर दिली आहे. पोलिस नाईक चौधरी हे तपास करत आहेत. तर अन्य एका घटनेत शहरातील फुलेनगर भागातील अंकिता दीपक ढाकणे ही ३२ वर्षीय महिला तिच्या दोन वर्षीय मुलीसह १५ ऑगस्ट रोजी स्कूटीवर घराबाहेर पडली होती. परंतु अद्यापपर्यंत सदर महिला घरी न परतल्याने तिच्याही कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली असून सदर घटनेचा तपास पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे व जमादार श्रीकांत चौधरी हे करत आहेत. दरम्यान, शहरातून दोन महिला अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ उडाली असून सदर महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

बातम्या आणखी आहेत...