आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शहरात अस्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, अंबाजोगाईकरांनी आंदोलनातून वेधले लक्ष

अंबाजोगाई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनासह शहरातील अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील नागरिकांनी मंगळवारी गजर आंदोलन केले. शहरात पसरलेली अस्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा नियमित करणे व पाणीपट्टी कमी करणे, घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते देणे, विद्युत व्यवस्था सुरळीत करणे भोगवटाधारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा आदी समस्यांवर हे आदाेलन करण्यात आले.

अंबाजोगाई शहरात स्वच्छतेअभावी नाल्या तुंबल्या आहेत, तर घंटागाड्या बंद असल्याने कचऱ्याचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. तुडुंब भरलेल्या नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेचे कंत्राट बंद असल्याने स्वच्छता कर्मचारी कामावर येत नाहीत. यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला असून स्वच्छतेविषयी तक्रारी वाढल्या आहेत.

नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता केली नाही. यामुळ अतिवृष्टी झाली तर नदीकाठच्या घरांत पाणी शिरून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जबाबदारी नगर परिषदेची असल्यामुळे हे काम त्वरित करावे. नगर परिषद स्वच्छता कंत्राटदाराची मुदत २ वर्षांपूर्वी संपलेली असताना ३१ मे २०२२ पर्यंत कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात आले. नगर परिषदेचे प्रशासक तथा सहायक कर्मचारी तथा उपनगर अभियंता यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याची महिला आयोगाकडे तक्रार केलेली असून यासंदर्भात अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

घरकुलाचे हप्ते प्रलंबित, पथदिवेही बंद
पंतप्रधान आवास योजनेच्या मंजूर घरकुलाचे हप्ते प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते. त्यामुळे प्रलंबित घरकुलाचे हप्ते त्वरित द्यावेत. शहरात विविध भागांत पोलवर बंद पडलेले लाइट सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली

बातम्या आणखी आहेत...