आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र सरकारने प्राधिकरणाकडे विकासाची जबाबदारी सोपवली होती, त्यासाठी राज्य महामार्ग आणि राज्यातील प्रमुख जिल्हा रस्त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन महाराष्ट्र प्राधिकरणाने सध्याचे रस्ते वाढवण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने हायब्रीड अॅन्युइटी वर महाराष्ट्र सरकारकडून त्यात सुधारणा करून प्रकल्प आधारावर निविदा प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला तसेच खाला पुरी ता.शिरुर प्राथमिक आरोग्य केंद्राची २.७० कोटीची निविदा प्रकाशित झाली असून या दोन्ही कामासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून १४५ कोटीच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असुन सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या मार्फत निविदा प्रकाशित झाली आहे. हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल मधून ३४ कि. मी. रस्त्याच्या प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यासाठी १४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
यासाठी आता निविदा प्रक्रिया पूर्ण होत असुन दोन पदरी आणि पेव्हड शोल्डर असलेला हा रस्ता कि.मी. ३३.७५ कि.मी. आहे. ३ मार्च २०२३ ला सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद मंडळ येथे पात्र एजन्सीचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते पॅकेज अंतर्गत हायब्रीड अॅन्युइटी मोड मधुन पाडळसिंगी पासुन पुढे बीड तालुक्यातील कुक्कडगाव, वडगाव, गुंधा, पिंपळनेर, ताडसोन्ना, केसापुरी परभणी, वडवणी अशा ३४ कि.मी. रस्त्याच्या मागणीला आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून अखेर यश मिळाले असून या रस्त्याच्या कामाची निविदा निघाली आहे. रस्त्याच्या या लिंकने गेवराई, बीड, वडवणी तालुके जोडले जाणार आहेत.
यापूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात आ.क्षीरसागर यांनी याबाबत रस्ता मंजुरीचे संकेत दिले होते.माजी मंत्री क्षीरसागरांच्या प्रयत्नातून पुर्वीच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाला लिंक रोड म्हणून खरवंडी, येळंब, आर्वी, नवगण राजुरी या राष्ट्रीय महामार्गाला मान्यता मिळाली होती. ३७ कि मी साठी १८० कोटी रुपयांची काम आणि हायब्रीड अॅन्युइटी मधुन राजुरी चिंचपूर ४५ कि.मी साठी १५० कोटी रुपयाची हि दोन कामे जे महा विकास अघाडी सरकारच्या काळात रखडले होते त्याला आता गती प्राप्त झाली असुन आता ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. या सर्व रस्त्यांवर येणार्या गावांच्या ग्रामस्थांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे अभार मानले आहेत.
दळणवळण होणार आता सुसह्य; वाहनचालकांना दिलासा खालापुरी ता.शिरुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न सद्धा मार्गी लागला असुन सदरील २.७० कोटीची निविदा प्रकाशित झाली आहे. तर रस्त्यामुळे पाडळसिंगी पासुन पुढे बीड तालुक्यातील कुक्कडगाव, वडगाव, गुंधा, पिंपळनेर, ताडसोन्ना, केसापुरीपरभणी, वडवणी अशा ३४ कि.मी. रस्त्याच्या या लिंकने गेवराई बीड वडवणी तालुके जोडले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.