आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला काळिमा फासणारी घटना:लग्नाचा तगादा लावत ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीस गावगुंडाने बळजबरी पाजले विष

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“माझ्यासोबत लग्न कर,’ असे म्हणत ऊसतोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला गावगुंडाने कीटकनाशक पाजल्याची घटना गेवराई तालुक्यातील काजळवाडी गावात मंगळवारी (३१ मे) रात्री आठ वाजता घडली. दरम्यान, कुटुंबातील लोकांनी गावगुंडाच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका करून पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

गेवराई तालुक्यातील काजळवाडी येथील अल्पवयीन मुलीचे आई-वडील ऊस तोडणीला साखर कारखान्यावर गेल्यानंतर ती तिच्या चुलत्याकडे राहत होती. ही संधी साधून गावातील २५ वर्षीय तरुण मागील दोन वर्षांपासून तिची छेड काढत होता. “माझ्या सोबत लग्न कर’ म्हणून धमक्या देत होता. शाळेत जाताना तिचा रस्ता अडवत होता. दरम्यान, मंगळवारी तरुण तिच्या शेतातील घरी गेला. लग्नाचा तगादा लावत त्याने मुलीला विष पाजले. मुलीच्या कुटुंबीयांनी गुंडाच्या तावडीतून मुलीची सुटका करून तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. तलवाडा पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आहे. उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी अधिक तपास पीएसआय अर्चना भोसले करत आहेत.

वसमत : मुलीचा स्कार्फ ओढून खाली पाडत केले जखमी
हिंगोली| वसमत शहरातील शुक्रवार पेठ भागात एका अल्पवयीन मुलीचा दुचाकीवर पाठलाग करून विनयभंग दोन अल्पवयीन मुलांनी विनयभंग केला. मुलीचा स्कार्फ ओढून तिला रस्त्यावर पाडून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

वसमतमधील एक अल्पवयीन मुलगी रविवारी (२९ मे) सायंकाळी ४.३० वाजता शुक्रवार पेठ भागातून घराकडे पायी जात होती. या वेळी शहरातील दोघांनी दुचाकीवर मुलीचा पाठलाग केला. त्यापैकी एकाने शिवीगाळ केली तर दुसऱ्याने मुलीचा स्कार्फ ओढला. त्यामुळे ती मुलगी खाली पडून जखमी झाली. त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी मुलीसह थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून मंगळवारी (३१ मे) रात्री तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक पोलिस निरीक्षक बोराटे, उपनिरीक्षक महिपाळे पुढील तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

विकृत प्रवृत्तीची घटना
विकृत प्रवृत्तीची ही घटना असून शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची गरज आहे. दामिनी पथक व प्रत्येक ग्रामपंचायतीत संरक्षण अधिकाऱ्याचा नंबर दिला जावा. या प्रकरणातील पीडितेची गुरुवारी भेट घेणार आहे. - संगीता चव्हाण, सदस्या, राज्य महिला आयोग.

बातम्या आणखी आहेत...