आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:अनोळखी मृतदेह आढळला; बुटाला बांधायच्या लेसने गळफास

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस हद्दीत तेलगाव कारखाना परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा बुटाला बांधायच्या लेसने गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. मृतदेह दिंद्रुड पोलिसांनी ताब्यात घेतला असून, परिसरात त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत.

कारी (ता.धारुर) येथील पिपरी लवण शिवारामध्ये बी एड कॉलेज च्या समोरच्या शेतात पळसाच्या झाडाला त्या अनोळखी इसमाने गळफास घेतल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पाेलिस शाेध घेत अाहेत.

अोरिसा से आया हूँ गळफास घेतलेला व्यक्तीने बुधवारी माजलगाव-धारूर हायवेवरून ये-जा करणाऱ्या गाड्यांना आडवे येऊन काही वेळ धुडगूस घातल्याचे पोलिस व स्थानिकांनी सांगितले. त्यावेळी तो ‘मै ओरिसा का हूं, मेरे बच्चे, औरत काे गंगा मे डाल के आया हु.’ असे तो ओरडत होता. अशी माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...