आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ; विकासाच्या पाठबळावर 2024 मध्येही पुन्हा मोदींचे सरकार असेल

अंबाजोगाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाईतील सत्कार सोहळ्यास लावली हजेरी विविध विकास कामाच्या पाठबळावर देशात २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार असेल असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी अंबाजोगाईत केला. येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळ्यास आठवले अंबाजोगाईत आले होते.

या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील आठ वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने देशात राष्ट्रीय रस्त्यांची मोठी कामे करून विकास घडवून आणला. काँग्रेसची इतके वर्षे सत्ता होती. परंतु, ते असा विकास घडवू शकले नाहीत. मोदी सरकारच्या विविध योजनेत झालेल्या कामाची माहिती देऊन, देशाने प्रगती साध्य केली आहे. याच बळावर पुढील २०२४ च्या पंचवार्षिक योजनेतही मोदींचेच नेतृत्व असेल रिपब्लिकन पक्ष त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचेही आठवले यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदेंसह रिपाइंचे इतर पदाधिकारी उपस्थित होते

स्थानिक निवडणुकाही लढवणार आरपीआयला राज्यसभेची एखादी जागा मिळायला पाहिजे होती. अशी खंत व्यक्त करत येणाऱ्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका निवडणुकीत आमची भाजपशी युती असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तशी चर्चा झाली असून आरपीआय युतीत प्रत्येक ठिकाणी पाच जागा घेणार असल्याची माहितीही आठवले यांनी देत आगामी मुंबई महानगर पालिकेत आम्ही एकत्र येऊन शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचू असा विश्वासही व्यक्त केला. फोडाफोडी करायची नाही, आमच्या जागा येत आहेत

आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी आमचे धनंजय महाडिक हेच राज्यसभेवर निवडून येतील, शिवसेनेने येथे उमेदवार उभा केल्याने भाजपला उमेदवार द्यावा लागला आहे. राज्यसभा निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारावर बोलताना, आठवले म्हणाले की, आम्हाला घोडेबाजार करण्याची गरज नाही, फोडाफोडी करायची नाही, आमची जागा निवडून येत असल्याचा दावाही रामदास आठवले यांनी केला.अंबाजोगाई येथे पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले. पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंचा दावा

बातम्या आणखी आहेत...