आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज:समाजाची एकसंघता ही काळाची गरज : पोखरकर

अंबाजोगाई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोपर्यंत समाजाचे संघटन होवून समाज एकसंघ होणार नाही तोपर्यंत समाजातील अडचण व समस्या मार्गी लागणार नाहीत. यासाठी समाजाने एकसंघ राहिले पाहिजे. अशी अपेक्षा बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांन केले.

अंबाजोगाई येथील लिंगायत, हटकर, कोष्टी समाजाच्या अंबाजोगाई शाखेच्या नूतन कार्यकारिणीची उदघाटक म्हणून विनोद पोखरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण हिरळकर, महाराष्ट्र राज्य लिंगायत , हटकर, कोष्टी समाज संघटनेचे प्रदेश सदस्य प्रविण उमराणे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन कार्यकरिणीचा सत्कार करण्यात आला.

अंबाजोगाई कार्यकारिणीच्य अध्यक्षपदी नृसिंह कानडे, उपाध्यक्ष गणेश मसनाळे, सचिव संतोष मानकेश्‍वर, सहसचिव बालाजी देवळे, कोषाध्यक्ष शुभम मसनाळे, संघटक संदिप शेंगोळे प्रसिद्धी प्रमुख अभिलाश हट्टे तर सदस्य म्हणून विशाल हट्टे, अशिष काळे, गणेश धरणे, संदीप होट्टे, अक्षय देवळे, दिग्गविजय कानडे, अमोल शेंगोळे यांची निवड झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन गणेश तरके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुकुंद पुरे यांनी मानले. या कार्यक्रमात समाजातील शिवहर होळगे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबावर कोसळलेल्या आपत्तीनंतर त्या कुटूंबाला समाजाच्या माध्यमातून ४८ हजार रूपयांची मदत करण्यात आली. तर या कुटूंबातील दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च समाजाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे यावेळी गणेश तरके यांनी सांगितले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांची उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...