आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाने शिदोड येथे महिलेस चिरडले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिदोड येथे सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन निघालेल्या महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले. शनिवारी ही घटना घडली. लक्ष्मीबाई सुनिल ससाणे (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्या गावाजवळील शेतात सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या.

डोक्यावर सरपणाचा भारा घेऊन त्या घराकडे निघाल्या असताना, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जागीच त्यांचा मृत्यू झला. स्थानिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. जिल्हा रुग्णालय चौकीत अंमलदार चंद्रसेन पवार यांनी नातेवाईकांचा जबाब घेतला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...