आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:पंचवीस वर्षांपासून बिनविरोध; बर्दापूर सोसायटी शेतकरी‎ विकास पॅनलची बाजी‎

अंबाजोगाई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बर्दापुर सेवा‎ सहकारी सोसायटीची निवडणूक ही‎ गेल्या पंचवीस वर्षांपासून बिनविरोध होत‎ होती. यंदा मात्र बालाप्रसाद बजाज व‎ सुधाकर सिनगारे यांच्या पॅनलमध्ये लढत‎ रंगली. या लढतीत बजाज यांच्या‎ शेतकरी विकस पॅनलने यश प्राप्त केले.‎ गेल्या २५ वर्षांपासून बर्दापूर सेवा‎ सोसायटीवर बालाप्रसाद बजाज यांचे‎ वर्चस्व राहिलेले आहे. यंदा सेवा‎ सोसायटीची निवडणूक ही बिनविरोध‎ निघेल असे वाटत असताना सरपंच‎ सुधाकर सिनगारे यांनी ही निवडणूक‎ प्रतिष्ठेची बनवत बळीराजा शेतकरी‎ विकास पॅनल मैदानात उतरवले.

रविवारी‎ (ता.१९ जून) निवडणूक पार पडली‎ असून या निवडणुकीत शेतकरी विकास‎ पँनलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार विजयी‎ ठरले. बजाज यांना पुन्हा एकदा सेवा‎ सोसायटी आपल्याकडे ठेवण्यात यश‎ मिळाले. दरम्यान, या निवडणुकीमुळे‎ गाव परिसरात मोठ्या उत्कंठेचे‎ वातावरण होते. जोडीला तणावही कायम‎ होता. बजाज यांच्या नेतृत्वाखालील‎ पॅनलने यंदाही यश मिळवत आपल्या‎ यशाची घौडदौड कायम ठेवली आहे.‎ त्यामुळे नूतन संचालक मंडळाचे‎ अभिनंदन करण्यात येत आहे. विजयी‎ पॅनलने यशानंतर गुलाल उधळत‎ जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...