आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उपजिल्हा रुग्णालयामध्ये अस्वच्छता

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेवराईमधील स्थिती, अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

गेवराईचे उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना मोफत उपचार घेण्याचे मुख्य ठिकाण आहे. मात्र, येथील वैद्यकीय आधिकारी यांचे मागिल काही महिन्यांपासून होत असलेल्या दुर्लक्ष व मनमानी पणामुळे रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयात विविध समास्यांचा विळाखा वाढू लागला आहे. बीडच्या शल्य चिकित्सक यांनी या रुग्णालयाकडे लक्ष घालून येथील कारभार सुधारण्यास संबधितांना भाग पाडावे अशी मागणी अखिल भारतीय गवळी संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष अंगद परळकर यांनी केली आहे.

म्राज्याचे माहेरघर होऊ लागले आहे.येथील अस्वच्छेतेचा रुग्णांण सोबत आलेल्या नातलगांना सामना करण्याची वेळ आली आहे. शौचालय, पिण्याच्या पाण्याचे ठिकाण, परिसरात ठिकठिकाणी नाल्यातील घाण पाणी, बेशिस्त पार्किंग, रुग्णवाहिका चालकांचा मनमानीपणा या समस्यांमुळे रुग्ण व नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

इथे येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन रुग्णांना बीडला रेपर करण्याचे प्रमाण अधिक वाढू लागले आहे. शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणच्या आवारातील घाणीमुळे रुग्णाण सोबत आलेल्या नातलगांना अशा ठिकाणच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.रुग्णालय आवारातील असलेल्या नाल्यातील घाण पाणी सर्वत्र परिसरात येत आसल्याने रुग्ण व नातेवाईकांना घाण पाण्यातून सध्या वाट काढावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...