आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडचा “स्पेशल डे’ पॅटर्न:शनिवारी दिव्यांगांनाच लस; 1320 जणांनी घेतले डोस; मंत्री मुंडेंच्या हस्ते उद्घाटन

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड शहरात दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले; राज्यभर संकल्पना राबवणार : मंत्री मुंडे

बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने शनिवारी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, बीडचा हा स्पेशल डे पॅटर्न राज्यभर राबवू, असे मुंडे म्हणाले. शनिवारी १३२० जणांचे लसीकरण झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार यांनी दिली.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेवून प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचा आपला मानस आहे, असे मत या वेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

या वेळी न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड, रा.यु. कॉ.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे, सुंदर गित्ते, सूर्यभान मुंडे, पं.स. सभापती बालाजी मुंडे, सय्यद सिराज, शरद कावरे, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार यांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...