आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैद्यनाथ’ची सर्वसाधारण सभा ऑनलाइन,सर्व ऊस गाळप करणार; काळजी करू नये : पंकजा

परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यनाथ साखर कारखान्याने पुढील गळीत हंगाम वेळेवर सुरू करून विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या सहकार्याने साखर उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी सभासदांसमोर बोलतांना व्यक्त केला.

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने झाली. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालक व्यंकटराव कराड यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांचे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर आणि कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, कर्मचारी यांचा विचार करून आणि आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना सुरू केला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारी कारखान्यांना आधार देणारे निर्णय घेतले त्याचाही फायदा झाला आहे. आगामी काळात साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका असल्याने हा उद्योग संकटातून बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...