आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदान:आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे मोलाचे योगदान

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण आणि समाजकारणात काम करत असताना एखादी व्यक्ती कितीही मोठ्या उंचीवर पोहोचली तरी शाळेत शिकविणाऱ्या गुरूजनांना कधीही विसरत नाही. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शिक्षकदिनी त्यांनी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशिर्वाद घेत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला.

जिल्हाभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा झाला. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यासह जिल्ह्यातील मान्यवरांनीही आपल्या शिक्षकांचे स्मरण करत शिक्षक दिन साजरा केला. परळी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शहरातील ज्या सरस्वती विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले, त्या शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक नानासाहेब कवडे यांच्या निवासस्थानी सोमवारी दुपारी जाऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. यासह आशिर्वाद घेतले. यावेळी कवडे गुरूजींच्या पत्नी तसेच कुटुंबिय उपस्थित होते.

दरम्यान, माझ्या शालेय जीवनातील गुरु हे कवडे गुरुजी असून राजकीय गुरू हे मुंडे साहेब आहेत. आमच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे, त्यांना वंदन करण्यासाठी मी आले, अशा भावना यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. आपल्या शिक्षकांना भेटल्यानंतर पंकजा मुंडे या शालेय आठवणींना उजाळा देण्यात अतिशय रमून गेल्या होत्या. यावेळी कार्यकर्ते, नागरिकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी शिक्षक कवडे यांच्या भेटीनंतर बॅक कॉलनीतील व्यंकटराव आदोडे या शिक्षकाच्या घरी जाऊन महालक्ष्मी व गणपती समोरील देखाव्याची पाहणी केली. आदोडे यांच्या कुटुंबात बहुतांश शिक्षक आहेत. शेतीपासून ते अंतराळापर्यंत अशा विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा मंत्रमुग्ध करणारा देखावा त्यांनी साकार केला. हा अप्रतिम देखावा व त्याचे सुंदर अशा सादरीकरणाचे पंकजा मुंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...