आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनराई बंधारा‎:शहाजानपूर येथे कृषी विभागाच्या‎ मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा‎

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत‎ लोकसहभागातून तसेच पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत‎ बीड तालुक्यातील शहाजानपूर येथे वनराई बंधाऱ्याचे‎ काम करण्यात आले. या बंधाऱ्याचा लाभ ५०० लोकांना‎ होणार असून शेतकरी बांधव समाधानी झाले आहेत.‎ बंधाऱ्याच्या कामासाठी जिल्हा कृषी अधीक्षक‎ बाबासाहेब जेजूरकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

तालुका‎ कृषी अधिकारी बी. आर. गंडे, मंडळ अधिकारी के. एस.‎ नागरगोजे, कृषी सहायक एस. एस. तळेकर यांच्यासह‎ पाणी फाउंडेशनचे समन्वयक मदने व ग्रामस्थांचे यासाठी‎ सहकार्य मिळाले. या कामामुळे वाहून जाणारे पाणी त्या‎ ठिकाणी मुरल्यामुळे परिसरातील बोरवेल विहिरींना‎ पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्याच्या‎ चेहऱ्यावर समाधान दिसेल.‎

बातम्या आणखी आहेत...