आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेतर्फे विविध उपक्रम; अंबाजोगाईत उद्यापासून स्वराज्य महोत्सव

अंबाजोगाई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था, जय हिंद ग्रुप व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२ पर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ला बनवणे स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा तसेच परमवीर चक्र विजेत्यांच्या स्मृतिप्रत्यर्थ वृक्षारोपण, भारतीय सेनेत कार्यरत असलेल्या सैनिकांचे सत्कार, शहीद जवानांच्या मातापित्यांचे सत्कार, मजुरांचे सत्कार, शेतकऱ्यांचे सत्कार, सामाजिक कार्यकर्त्यांचे सत्कार तसेच ६ ऑगस्ट रोजी ७५०० विद्यार्थ्यांना शांततेची शपथ दिली जाणार आहे. तसेच २० ऑगस्ट सदभावना दिवसानिमित्ताने या सर्व कार्यक्रमांच्या समारोपाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत व प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. तसेच पतसंस्थेच्या वतीने ‘हर घर झेंडा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती देताना जय हिंद ग्रुपचे समन्वयक पतसंस्थेचे सचिव तथा मंदिर विभागप्रमुख सुभाष शिंदे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष आर.एम. साळवी, कोषाध्यक्ष सुशील कुलकर्णी, पतसंस्थेचे सहसचिव बी. के. मसने, सहसचिव संतोष चौधरी, एम. बी. लोखंडे, संचालक डी. आर. देवळे, ए. एम. चौधरी, आर आर परळीकर, प्रा. डॉ.पी. एम. भोसले,मुख्याध्यापक श्री. के.बी. नांदगावकर तसेच जेष्ठ पत्रकार तथा माजी मुख्याध्यापक श्री शिवकुमार निर्मळे, ज्येष्ठ पत्रकार तथा परिवेक्षक रवींद्र मठपती, पत्रकार राहुल देशपांडे हजर होते.

विद्यार्थ्यांत देशभक्ती मूल्य बळकट होणार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व सहकार विभागाच्या आदेशानुसार समाज उपयोगी तसेच विद्यार्थ्यांमध्ये देश भावना, देशभक्ती जागृत करण्यासाठी या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
- प्रा.एस.पी.कुलकर्णी, अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्था

बातम्या आणखी आहेत...