आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:भवरखेडा अन‌् विवरे येथील विविध‎ विकासकामांचा केला शुभारंभ‎ ; पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील यांनी केले उद्दघाटन

धरणगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिका करणाऱ्यांना नेहमीच‎ कामाच्या माध्यमातून उत्तर देत‎ असतो. जलजीवन मिशन अंतर्गत‎ भवरखेडा आणि विवरे या दोन्ही‎ गावांच्या सुमारे ३ कोटीची मंजूर‎ पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण‎ करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना‎ दिले आहेत, असे प्रतिपादन‎ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी‎ केले.‎ भवरखेडा आणि विवरे येथे‎ विविध कामांचा शुभारंभ करताना‎ ते बोलत होते. धरणगाव - विवरे -‎ भवरखेडा - तालुका हद्दीपर्यंतचा‎ १२ किमी रस्त्यासाठी १० कोटी, तर‎ विवरे - जांभोरा - सारवे खुर्द -‎ बिलखेडा या १० किमी रस्त्यासाठी‎ ८.५० कोटी असे एकूण १८ कोटी‎ ५० लाख रुपये मंजूर आहेत.‎

लवकरच या रस्त्याचा कामाला‎ सुरुवात होणार आहे, असे‎ पालकमंत्र्यांनी सांगितले.‎ भवरखेडा आणि विवरे येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीपुरवठा योजनेचेही काम‎ होणार आहे. जलजीवन मिशन‎ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १‎ कोटी ३९ लक्ष , २५१५ अंतर्गत रस्ता‎ काँक्रीटीकरण (१० लाख),‎ स्मशानभूमी सुशोभीकरण (पाच‎ लाख), नवीन १०० केव्हीए‎ ट्रान्सफार्मर (१० लाख), जि. प.‎ शाळा संरक्षक भिंत बांधकाम (२६‎ लाख), विवरे येथे जलजीवन‎ मिशन अंतर्गत पाणीपुरवठा‎ योजनेसाठी १ कोटी ४७ लाख,‎ सामाजिक सभागृह या कामांचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

जिल्हा प्रमुख‎ नीलेश पाटील, सरिता माळी-‎ कोल्हे, शोभा चौधरी, पी. एम.‎ पाटील, गजानन पाटील, धनराज‎ माळी, डी. ओ. पाटील, माजी‎ जि.प. सदस्य प्रताप पाटील, पं. स.‎ माजी सभापती मुकुंद नन्नवरे,‎ प्रेमराज पाटील, भानुदास पाटील‎ उपस्थित होते. या कार्यक्रमास‎ परिसरातील नागरिकांची माेठी‎ उपस्थिती हाेती.‎

बातम्या आणखी आहेत...