आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा प्रतिसाद:विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी सादर केले विविध प्रयोग

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालयात २२ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यामध्ये बाल वैज्ञानिकांनी मोठा सहभाग घेत विविध विषयांवर आपले प्रयोग सादर केले. तालुक्यातील या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा, त्यांच्यातील संशोधकाला चालना मिळावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येते. यंदा ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बीड तालुक्याच्या वतीने शहरातील केएसपी विद्यालयात करण्यात आले होते.

प्रदर्शनाच्या उद््घाटन कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतनचे प्रा. गुरगुडे व प्रा. वरोदे यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. संस्थाध्यक्षा अंजली शेळके, शाळेचे मुख्याध्यापक जगदीश शिंदे, पाटोदा गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये बीड तालुक्यातील ६८ शाळांनी सहभाग नोंदवला. प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक सेंट अन्स शाळा तर द्वितीय क्रमांक जि. प.प्रा.शाळा ताडसोना,तर तृतीय क्रमांक जि. प.प्रा.शाळा चौसाळा तसेच माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक के.एस.पी.विद्यालय तर द्वितीय क्रमांक द्वारकदास मंत्री माध्यमिक विद्यालय आणि तृतीय क्रमांक सेंट अन्स शाळा बीड असे अनुक्रमे सर्व शाळांनी यश संपादन केले.

यावेळी बोलताना मान्यवर म्हणाले, तरुण पिढीला विज्ञान मार्गाकडे नेण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर विद्यार्थी हे नवनवीन गोष्टींचे शोध घेवू शकतात आणि नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये उतरवू शकतात त्यामुळे मुलांना विज्ञानाविषयी आपुलकी व आवड निर्माण होण्यासाठी असे विज्ञान प्रदर्शन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. सूत्रसंचालन बी. वाय. वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...