आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकार्य:धारूरला विविध संघटनांनी एकत्र येऊन सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

धारूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध संघटनांच्या वतीने येथील कसबा भागातील शहराच्या दक्षिण भागात असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवली. या अभियानात शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवत स्वच्छता केली.

शहरात मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत स्थानिक संघटनांच्या वतीने सातत्याने दर रविवारी स्वच्छता अभियान राबवले जात आहे. मागील पाच ते सहा रविवारपासून येथील नगर परिषदेंतर्गत असलेल्या हुतात्मा स्मारकाची स्वच्छता तसेच पेठ भागातील सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवले आहे. रविवारी ( २० मार्च) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरातील कसबा भागात दक्षिणेस असलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता मोहिमेत येथे असलेली काटेरी झुडपे तोडून त्याचे खोड यंत्राच्या साहाय्याने काढून टाकले. मोठे खड्डे बुजवले. तसेच येथील वाढलेले गाजर गवत जाळून टाकत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत शहरातील कायाकल्प फाउंडेशन, यूथ क्लब, सकल मराठा समाज, जय किसान मित्र मंडळ या संघटनांनी सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...