आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:कानडी बदन येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

केज20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील कानडी बदन येथील वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामकृष्ण मुळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संतोष मोरे, मगन पांचाळ, पद्माकर सोमवंशी, मधुकर मुळे, नरहरी काकडे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांसह प्रिया गुळभिले, आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी “ शिक्षक दिन “ याविषयी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयीची माहिती व्यक्त केली. सुत्रसंचलन मधुकर मुळे यांनी तर आभार मगन पांचाळ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...