आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह प्रारंभ:वीरशैव समाज सप्ताह प्रारंभ

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा १२१ वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास ३० ऑगस्टपासून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी, संत शिरोमणी मन्मथ स्वामी, श्री सद्गुरू १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अमित चंद्रकांतबुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम ५ सप्टेंबर पर्यंत होणार असून श्री सद्गुरू १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.मागील २ वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे होवू न शकलेला श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके व विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात होत आहे.

शिवनाम, श्री गुरुलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सकाळी ७ ते ८ शिव सहस्त्रनामावली, सकाळी ९ ते ११ परमरहस्य व श्री पलसिद्ध महात्म्य पारायण, सकाळी १०.३० ते १२ पर्यंत श्री मन्मथ स्वामी गाथा भजन, दुपारी ३ ते ५ व शिव पाठ आरती, सायंकाळी ५.३० ते ६.३० सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडेकर यांचे प्रवचन रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...