आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोंढा रोड भागातील बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवाला सुरूवात झाली असुन शुक्रवारी दुपारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला... हरी ओम विठ्ठला... व्यंकटरमणा गोविंदा... गोविंदाच्या जयघोषात हंस वाहन शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील पेठबीड भागातील भगवान बालाजी मंदिरापासुन शुक्रवारी दुपारी हंस वाहन शोभायात्रेत बालाजी भगवान हंस वाहनावर आरुढ झाले होते. तर सायंकाळच्या शोभायात्रेत गरुड वाहन शोभायात्रा काढण्यात आली. बीड शहरात भगवान बालाजी यांच्या शुक्रवारच्या हंस वाहन शोभायात्रेची गोविंदा ग्रुपच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली.
ही हंस वाहन शोभायात्रा मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर नगरसेवक भैय्या मोरे, रणजित बनसोडे, जवाहरलाल सारडा, प्रमोद निनाळ, जुगल दायमा, आर.आर. कासट, गोविंद कासट, संतोष टवाणी, डी.एम सारडा, राजू शेठ बियाणी, राजेंद्र बन्सोडे, शिवप्रसाद कासट, प्रमोद मनियार, दत्तात्रय नलावडे, सुरेश बन्सोडे, लक्ष्मण शेनकुडे, जयंत राऊत, डॉ.झंवर, गुरुप्रसाद पांडे, संजय कोरे, गिरीश करवा, उमेश सिकची, बाबुराव परळकर, प्रकाश कानगावकर, दत्तात्रय तळेकर, धर्मराज ताठे, भागचंद परदेशी, संजय घेणे, भारत मस्के, रेवणवार, सुरेश साळुंके आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.