आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक काढणीचे नियोजन:नुकसानग्रस्तांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक काढणीला आलेले आहे, त्याचे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पीक काढणीचे नियोजन करण्यात यावे व दरम्यानच्या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत अथवा काढणी पश्चात, पाणी साचून जर नुकसान झाले असेल तर खरीप २०२२ पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाईन तक्रार करावी. दरम्यानच्या काळामध्ये नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी दाखल करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करावे किंवा बजाज एलियांज जीआईसी लिमिटेडचे नवीन फार्ममित्र ॲप डाऊनलोड करावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करता येईल. दरम्यान, बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वेगाच्या वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...