आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:लालबागच्या राजासह अष्टविनायकांचे देखाव्यातून दर्शन

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत संकुलात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. १० हजार स्क्वेअर फूट जागेत अष्टविनायकांची हुबेहूब मंदिरे साकारली आहेत. मधोमध पाण्याचे आकर्षक कारंजे व व्यासपीठावर लालबागच्या राजासोबत गुरुकुल व आधुनिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे देखावे साकारले आहेत. हे देखावे परळीकरांसाठी आकर्षण ठरत असून देखावे पाहण्यासाठी गर्दी होतेय.

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून वैद्यनाथ औद्योगिक वसाहत संकुलात श्री गणेशाची स्थापना व स्थायी देखावे साकारले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या मोरगावचा मयूरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, रांजणगावचा महागणपती, महाडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर या अष्टविनायकांचे देखावे साकारले आहेत. देखाव्याच्या ठिकाणी प्रवेश करताच डाव्या बाजूस मोदक खात असलेला मूषक व सभागृहाच्या दोन्ही बाजूंनी अष्टविनायक, मधोमध रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केलेले पाण्याचे कारंजे व व्यासपीठावर लालबागचा राजा आणि एका बाजूस गुरुकुलात शिक्षण घेणारे विद्यार्थी, तर दुसऱ्या बाजूस आधुनिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी असे देखावे गणेशभक्तांना आकर्षित करत आहेत. या देखाव्यांसाठी कंदील व मंद प्रकाशाची रोषणाई केलेली असल्याने रात्रीच्या वेळी हे देखावे अधिकच आकर्षक दिसताहेत.

राजस्थानसह हरियाणातून आणले साहित्य
गणेशोत्सवातील या देखाव्यांमध्ये मंदिर बनवण्यासाठी राजस्थान व हरियाणा येथील सरकंडा वनस्पती, पाली गवत वापरण्यात आले आहेत. अष्टविनायकांच्या मूर्ती माती आणि क्लेपासून साकारल्या आहेत. सर्व देखावे व सजावट पर्यावरणपूरक वस्तूंपासून केली आहे.

राजस्थानसह हरियाणातून आणले साहित्य
गणेशोत्सवातील या देखाव्यांमध्ये मंदिर बनवण्यासाठी राजस्थान व हरियाणा येथील सरकंडा वनस्पती, पाली गवत वापरण्यात आले आहेत. अष्टविनायकांच्या मूर्ती माती आणि क्लेपासून साकारल्या आहेत. सर्व देखावे व सजावट पर्यावरणपूरक वस्तूंपासून केली आहे.

सामाजिक उपक्रमही
राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक, धार्मिक उपक्रम सातत्याने घेत असतो. यंदा अष्टविनायक देखावे साकारले आहेत. येत्या नवरात्रोत्सवात वैष्णोदेवी मंदिर व परिसराचा देखावा साकारणार आहोत. या देखाव्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.-चंदुलाल बियाणी, अध्यक्ष, राधा-मोहन साथी प्रतिष्ठान

बातम्या आणखी आहेत...