आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासनाच्या प्रयत्नांनी बालविवाह रोखला जातो परंतु नंतरच्या काळात मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता मुलीचे पालक तिचा विवाह गुपचूप उरकून घेतात. यामुळे या प्रकरणांमध्ये नंतर देखील मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करून सतर्कता राखली जावी अशा सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बालविवाह प्रतिबंध कायदा अंतर्गत जिल्हा टास्क फोर्स ची बैठक जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोसावी , जिल्हा क्रीडा अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस तसेच महिला व बालविकास क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सोनिया हंगे , मनस्विनी प्रकल्पाच्या अरुंधती पाटील , चाइल्ड लाईनचे समन्वयक रामहरी जाधव, तत्त्व शील कांबळे, अतुल कुलकर्णी, अशोक तांगडे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत यावेळी सखोल चर्चा झाली आणि आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला तो जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व युनीसेफ़ अंतर्गत//"सक्षम//" उपक्रमाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. विविध सदस्यांची मनोगत ऐकून घेऊन व आराखड्याबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्याची माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये टोल फ्री क्रमांक १०९८ प्रदर्शित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि याबाबत दोन दिवसात अहवाल सादर केला जावा असे स्पष्ट निर्देश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.