आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके कोमेजली:जोमात आलेली पिके कोमेजली, भरपाई द्यावी

पाटोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता पीके कोमेजून गेली आहेत. शासनाने पंचनामे करत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दीपक घुमरे यांनी केली आहे. याबाबत घुमरे यांनी पत्रकात म्हटले आहे, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.

या कृषिप्रधान देशातच आपल्या शेतकरी वर्गाची प्रत्येक वेळेस दयनीय अवस्था होत असते. कधी नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, दुष्काळ, अपुरा पाऊस या विविध कारणांमुळे शेतकरी सतत संकटात सापडत आला आहे. या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन भरघोस खर्च करून सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांची लागवड केली. पिके एकदम जोमात आली होती. परंतु, पाटोदा तालुक्यात गोगलगायींमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि आता जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे सर्व जोमात आलेली पिके कोमात गेली. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी व पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा, अशी मागणी घुमरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...