आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक‎ बिनविरोध:विखे पाटील कारखाना अध्यक्ष-‎ पदी थोटे, उपाध्यक्षपदी देशमुख‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील उमरी फाटा येथील पद्मश्री डॉ.‎ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर‎ कारखान्याच्या अध्यक्षपदी नवनाथ थोटे यांची तर‎ उपाध्यक्षपदी बाबाराजे देशमुख यांची बिनविरोध‎ निवड झाली आहे.‎ केज तालुक्यातील उमरी फाटा येथील पद्मश्री‎ डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर‎ कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक‎ बिनविरोध झाली होती. खासदार रजनीताई पाटील‎ यांनी या कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवले होते.‎ कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या‎ निवडी ही बिनविरोध झाल्या असून अध्यक्षपदी‎ नवनाथ थोटे यांची तर उपाध्यक्षपदी बाबाराजे‎ देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.‎

कारखान्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी हे‎ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतील असे मत‎ त्यांनी व्यक्त केले. निवडीनंतर खासदार रजनीताई‎ पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी कारखान्याचे‎ नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार‎ केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब‎ देशमुख, गंगामाऊली शुगरचे चेअरमन हनुमंत‎ मोरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे,‎ पशुपतीनाथ दांगट, प्रकाश भन्साळी, प्रविणकुमार‎ शेप यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...