आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मंगळरुळ क्रमांक १ येथील जि.प.प्रा. शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा विलास धनवडे ही सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण होऊन इस्रो सहलीची मानकरी ठरली. नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी झालेल्या जिल्हास्तरीय अंतिम चाचणी परीक्षेचा निकाल सीईओ अजित पवार यांनी जाहीर केला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३३ शाळकरी मुला-मुलींना प्रथम इस्त्रो अंतरिक्ष संस्थेच्या सहलीची संधी मिळत आहे.तर या ३३ विद्यार्थ्यांपैकी माजलगाव तालुक्यातून ऋतुजा विलास धनवडे, विशाल दिगंबर गायके, निकिता मुंजाबा वाशिंबे या विद्यार्थ्यांना इस्त्रो संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीबद्दल ऋतुजा विलास धनवडेचे उपसरपंच प्रदीप घाटूळ, शेख हरुण, पत्रकार अलीम सय्यद,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांता घाटूळ यांनी कौतुक व अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक बी.व्ही.शिंदे, प्रभारी मुख्याध्यापक बी. जी. रणदिवे शिंदे, विज्ञान शिक्षक यु. एस. शिंदे, गणित शिक्षक एन. के. कुलकर्णी, अविनाश येळंबकर, भागवत कोकणे, संगीता राठोड, गंगासागर राऊत यांच्यासह वर्गशिक्षक केशव बादाडे व पालक विलास धनवडे यांनी मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.