आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:विनायक माध्य. विद्यालयात‎ चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद

बीड‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक माध्यमिक विद्यालयामध्ये बुधवारी ‎ऐतिहासिक स्थळ या विषयावरील शालेय ‎चित्रकला स्पर्धास विद्यार्थ्यांचा भरभरून‎ प्रतिसाद मिळाला.‎ याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण‎ कुलकर्णी, विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पवार, ‎आकाश पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक‎ सुहास आमरापूरकर, चित्रकलेचे शिक्षक‎ डी.एम. शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.‎ या चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी‎ गटात सत्यजित सतीश पवार याने प्रथम,‎ निकिता किशोर जगताप हिने द्वितीय तर तृतीय‎ बक्षीस जानवी अर्जुन सोनटक्के यांनी‎ पटकावले.

उत्तेजनार्थ बक्षीस सय्यद सभा‎ एजाज, शौर्य शिवलिंग क्षीरसागर, सय्यद‎ आयेगा इसाक, श्रुती अनंता जाधव, ज्ञानेश्वरी‎ गोरख काळे या विद्यार्थ्यांनी बक्षिसे‎ पटकावली. मोठ्या गटात प्रथम खान आलिया‎ परवीन अमान खान, द्वितीय सय्यद मिसबा‎ जीलानी तर तृतीय बक्षीस श्रेयस जालिंदर‎ जाधव या विद्यार्थ्यांनी पटकावले तर‎ उत्तेजनार्थ बक्षीस शेख नवाज हुसेन, सय्यद‎ इरशाद इसाक, शेख रेहान युनुस, सय्यद हर्षद‎ अली, शेख फैजान शेरू आदी विद्यार्थ्यांनी‎ पटकावली या यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करून त्यांना‎ बक्षिसे व प्रशस्तिपत्रे देऊन सन्मान करण्यात‎ आला.

या चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील‎ ३२९ विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला. प्रथम‎ येणाऱ्या स्पर्धकास ५० ग्राम चांदीचे मेडल‎ द्वितीय ३० ग्रॅम चांदीचे मेडल तृतीय २० ग्राम‎ चांदीचे मेडल दोन्ही गटात सहा चांदीचे मेडल‎ व प्रमाणपत्र देण्यात आले. व उत्तेजनार्थ सोळा‎ पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आली. सर्व‎ ३२९ सहभागी स्पर्धकांना दर्जेदार पॅडचे वाटप‎ करण्यात आले. सूत्रसंचालन एस बी वाघमारे‎ यांनी केले. या कार्यक्रमात कल्याण कुलकर्णी,‎ विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पवार, आकाश‎ पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून‎ सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...