आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटेंच्या अपघाताचे गूढ वाढले!:कार्यकर्त्याचा दावा - 3 ऑगस्टलाही अपघाताचा प्रयत्न, मेटेंच्या चालकाची उडवाउडवीची उत्तरे

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यात मेटे यांचा निधन झाला असून, चालक मात्र सुरक्षित आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात प्रकरणी मेटेंचा चालक एकनाथ कदम याची पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र, चौकशीदरम्यान चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रायगडमधील रसायनी पोलिस अधिक चौकशीसाठी ड्रायव्हरला पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

ट्रक मालक ताब्यात

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 14 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सोमवारी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मेटे यांच्या अपघाती निधनावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेला ट्रक पालघरमधला असल्याचे समोर आले आहे. हा ट्रक गुजरातमध्ये गेला होता. त्यानंतर पोलिसांची एक तुकडी गुजरातला रवाना झाली. या ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कार्यकर्त्याचा खुलासा

विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करण्याचे आदेश दिले असून, वेगवेगळी पथक या घटनेचा सखोल तपास करत आहे. दरम्यान मेटे यांच्या एका कार्यकर्त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे अपघातामागचे गूढ अधिकच वाढले आहे.

2 किमीपर्यंत पाठलाग

शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर म्हणाले, 3 ऑगस्ट रोजी पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यात एक अर्टिगा कार आणि एक आयशर होता. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होता. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला.

चालक सुटीवर?

विनायक मेटे यांचा अपघात 14 ऑगस्ट रोजी झाला. त्या रोजी मात्र त्यांचा चालक समाधान वाघमोडे हा सुट्टीवर होता, अशी माहितीही वायकरांनी दिली आहे. समाधान वाघमोडेच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे तो त्याच्या गावी गेला होता. त्याच्या जागेवर एकनाथ कदमला चालक म्हणून बोलावण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...