आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक मेटेंच्या पत्नीची मागणी:अपघाताची चौकशी करावी, नेमके काय झाले समजायला हवे, आमचे कुटुंब पोरके झाले

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला हवे. त्यामुळे या अपघाताची चौकशी करावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, या अपघातामुळे आमचे कुटुंब पोरके झाले आहे. त्यामुळे सत्यस्थिती समोर येणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मेटेंच्या अपघाताबाबत मराठा समाजातील नेते व शिवसेनेने संशय व्यक्त केलेला असतानाच आता विनायक मेटे यांच्या कुटुंबातूनच अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

अपघातानंतर नेमके काय झाले?

ज्योती मेटे म्हणाल्या, मी स्वत: डॉक्टर आहे. विनायक मेटेंना रुग्णालयात आणताच त्यांचे शरीर पाहिल्यानंतर समजले होते की, हा अपघात काही वेळेपूर्वी झालेला नाही. किमान दीड, दोन तासांपूर्वी अपघात झालेला असावा. अपघातानंतर नेमके काय झाले, हे मला माहिती नाही. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.

अपघाताचे स्थळ समजत नव्हते

ज्योती मेटे यांनी सांगितले, रविवारी पहाटे मला सर्वप्रथम विनायक मेटेंच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला, तेव्हा मला वाटले ते घरीच आले. तेव्हा मला प्रथम त्यांच्या अपघाताबाबत कळाले. नंतर मी पुन्हा त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागला नाही. तरीदेखील मी तातडीने पोलिस व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देऊन त्यांना तातडीने घटनास्थळी रवाना होण्यास सांगितले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपत्कालीन सेवा असलेल्या रुग्णवाहिकेचा नंबर सर्वांनाच माहित असतो. मेटे यांच्या ड्रायव्हरला तो माहित नसेल हे शक्य नाही. ड्रायव्हरने आम्हाला ते नेमके कुठे आहेत, हेदेखील सांगितले नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

पक्षाला पोरके होऊ देणार नाही

विनायक मेटे यांच्या अकाली जाण्यामुळे आमचे कुटुंब पोरके झाले, असे शोकाकुल ज्योती मेटे यांनी सांगितले. ज्योती मेटे म्हणाल्या, खूप कष्ट आणि मोठ्या संघर्षातून विनायक मेटेंनी कुटुंबाला तसेच शिवसंग्राम पक्षाला उभे केले. त्यांना स्वत:च्या कष्टाबद्दल, संघर्षाबद्दल बोलायला आवडत नव्हते. रविवारी अपघात झाला, त्यादिवशीदेखील बीडमध्ये शिवसंग्रामची रॅली होती. मी त्या रॅलीला नसणार, असे चुकूनही कार्यकर्त्यांना सांगू नको, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असला तरी शिवसंग्राम पक्षाला मी पोरक होऊ देणार नाही. माझ्याकडून जेवढे होईल, तेवढे मी करेल.

मेटेंना अचानक मुंबईला बोलावले कुणी?:शिवसेनेसह मराठा समाजातील नेत्यांचा सवाल, अपघातावर संशयकल्लोळ

बातम्या आणखी आहेत...