आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:विनायक मेटेंचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार, शिवसंग्राम अध्यक्षपदी निवडीनंतर डॉ. ज्याेती मेटे यांनी दिली ग्वाही

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील टिळक रोडवरील डाॅ. नीतू मांडके हाॅल मध्ये प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होवुन संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीत डॉ. ज्योती विनायक मेटे यांची शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी शिवसंग्राम संघटना टिकवणार -वाढवणार यात तीळ मात्र शंका नाही. स्व.विनायकराव मेटे यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत संघटना सर्व पदाधिकारी, मावळे, गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजासोबत असल्याचा विश्वास यावेळी डॉ.ज्योती मेटे यांनी व्यक्त केला. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी स्विकारावी, मित्रपक्ष या नात्याने भाजपाने राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी डॉ.ज्योती मेटे यांची शिफारस करावी, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान द्यावे असा ठराव शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत दरम्यान एकमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीस शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे , प्रदेश उपाध्यक्ष राजन घाग, संदीप पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर , प्रदेश सचिव शेखर पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...