आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; केज शहरामध्ये पोलिसांची सोळा‎ वाहनांवर दंडात्मक कारवाई‎

केज‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाहन‎ उभे करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १२ हजार १००‎ रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.‎ केज शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीसह‎ इतर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात ‎ ‎ असल्याने वाहतूक कोंडी होत असून ‎पदचाऱ्यांनाही रस्त्याने व्यवस्थितपणे चालता‎ येत नाही.

त्यामुळे अशा वाहतुकीच्या‎ नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस‎ अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई‎ करण्याच्या सूचना सहायक पोलिस अधीक्षक ‎पंकज कुमावत व सहायक पोलिस निरीक्षक‎ शंकर वाघमोडे यांनी वाहतूक शाखेस दिल्या‎ होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेचे पो. कॉ.‎ नितीन जाधव यांनी मुख्य रस्त्यावर‎ अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या १६ वाहनांवर‎ दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १२‎ हजार १०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली.‎

अशा वाहनांवर नियमितपणे‎ कारवाई करण्यात येणार‎ रस्त्यावर जे वाहन अस्ताव्यस्त उभे‎ दिसेल. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई‎ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे‎ यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या‎ वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाणार‎ आहे. शहरातून जाताना वाहनचालकांनी‎ मर्यादित गती ठेवावी, तर विना नंबरच्या‎ वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.‎ रंगीबेरंगी नंबर प्लेट काढून टाकाव्यात.‎ - शंकर वाघमोडे , सपोनि. पोलिस ठाणे‎ केज.‎ वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावलेल्या वाहनांवर कारवाई केली.‎

अशा वाहनांवर नियमितपणे‎ कारवाई करण्यात येणार‎ रस्त्यावर जे वाहन अस्ताव्यस्त उभे‎ दिसेल. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई‎ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे‎ यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या‎ वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाणार‎ आहे. शहरातून जाताना वाहनचालकांनी‎ मर्यादित गती ठेवावी, तर विना नंबरच्या‎ वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.‎ रंगीबेरंगी नंबर प्लेट काढून टाकाव्यात.‎ - शंकर वाघमोडे , सपोनि. पोलिस ठाणे‎ केज

बातम्या आणखी आहेत...