आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताब्यात:स्वाराती रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृत अर्भक टाकणारी कुमारी माता ताब्यात

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागातल्या शौचालयाच्या बकेटमध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह दोन महिलांना शहर पोलिसांनी रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे प्रकरण अत्याचारातून झाल्याचे पोलिसांचे म्हणणेे आहे.अत्याचार करणाऱ्या विरूद्ध पाॅक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार आहे.

स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागातील शौचालयात २ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सफाई कर्मचारी साफसफाई करत असताना लाल रंगाच्या बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते.पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक फौजदार भागवत कांदे व हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले यांच्याकडे तपास होता.पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. अपघात विभागातील सर्व रेकॉर्ड पोलिसांनी तपासले असता त्यांना एका गावाच्या नावाची छोटी चिठ्ठी आढळून आली.पोलिसांनी अंबाजोगाई परळी,केज धारूर तालुका तालुक्यातील त्या गावचा शोधा शोध केली असता ते गाव धारूर तालुक्यात आढळून आले.

अर्भकाची डीएनए चाचणी, मातेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल होणार अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेची वैद्यकीय तपासणी होणार आहे.अर्भकाची तपासणी औरंगाबाद येथे डीएनए व वेगवेगळ्या तपासणी केल्यानंतरच उलगडा होईल. अत्याचारातून हा प्रकार झाल्याने दुसरा गुन्हा नोंद केला जाईल. अत्याचार झाला तेंव्हा पिडीता अल्पवयीन होती त्यामुळे या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...