आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:सैनिकी विद्यालयात विभागीय प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांची भेट; उपक्रमांची पाहणी

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगण संचालित सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद विभागाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी भेट देऊन सर्व परिसराची पाहणी केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद विभागाच्या प्रकल्प अधिकारी बोकडे यांनी गुरुवारी (ता.१६ जून)सैनिकी विद्यालय बीड या ठिकाणी भेट देऊन शाळा परिसर व सुविधांची पाहणी केली. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते सैनिकी ध्वज फडकावून स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊ प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांचे प्राचार्य डाके यांनी स्वागत केले. यासह प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शाळेबाबत माहिती दिली.

प्रकल्प कार्यालय अधिकारी पालवे हे देखील उपस्थित होते. बोकडे यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार शिक्षण पोचवण्याचे कार्य अधिक ताकतीने पुढे सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. सैनिकी शाळेचे शिक्षक नामदेव साळुंके यांनी गायलेल्या स्वागत गीताचे, क्रीडा विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.अविनाश बारगजे व डॉ. विनोदचंद्र पवार यांचे तसेच सैनिकी विभागाचे सेना पदक विजेते मेघराज कोल्हे, फुलचंद गायकवाड व विजयकुमार धारणकर यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...