आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक स्थळांना भेट:आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या‎ ऐतिहासिक स्थळांना भेटी‎

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेंडेवाडी प्राथमिक व‎ माध्यमिक आश्रम शाळेच्या‎ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच‎ पार पडली. यात विद्यार्थ्यांनी‎ ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. श्री‎ क्षेत्र तुळजापूर, कोल्हापूर, पन्हाळगड‎ किल्ला, श्री महालक्ष्मी, कन्हेरीमठ,‎ शाहू पॅलेस, पंढरपूर, शिखर शिंगणापूर‎ आदी ऐतिहासिक आणि धार्मिक‎ स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.‎ ऐतिहासिक घटना समजून घेऊन‎ धार्मिक महत्त्वही समजून घेतले.

यात‎ ऐतिहासिक वास्तू, गड - किल्ले आदी‎ स्थळे पाहता आल्याने विद्यार्थी आनंदी‎ दिसत होते. सहलीच्या आयोजनासाठी‎ प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे‎ शिक्षक विजय राठोड, बिराजदार,‎ सुडे, मादाळे, कांदे, चव्हाण, सुभाष‎ राठोड, चंदनशिवे, डुमने आदींनी‎ विशेष परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...