आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गुप्त मतदानात मत फुटले; सरपंचासह पतीला मारहाण, तरटेवाडीत राडा, पराभव जिव्हारी, घराचीही केली तोडफोड

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाचेच मत फुटल्याने झालेला पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीच्या गटाने आपल्याच गटातील महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला मारहाण करत घराची तोडफोड कली. ही घटना तरटेवाडी (ता. गेवराई) येथे गुरुवारी दुपारी घडली. या मुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी रात्री साडेआठ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

तालुक्यातील सिरसमार्ग- तरटेवाडी-काळेवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ११ पैकी ६ जागा, तर भाजप पुरस्कृत पॅनलला पाच जागा मिळाल्या होत्या. एका सदस्याच्या फोडाफोडीवरून राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे दोन्ही गटाने निवडीच्या अगोदर काही दिवस आपले सदस्य सहलीवर पाठवले होते. गुरुवारी सकाळी सरपंच व उपसरपंच पदाची निवड झाली. सरपंच पदासाठी राष्ट्रवादीकडून सीमा सुरेश मारकड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. परंतु, भाजपकडून सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाला नसल्याने सीमा सुरेश मारकड यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड जाहीर केली. उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीकडून विनोद चव्हाण व भाजपकडून मेघा अनिल पवळ यांचे अर्ज दाखल झाले होते. गुप्त मतदानात मेघा पवळ या उपसरपंच म्हणून निवडून आल्या.

दुपारनंतर सुरू झाला राडा उपसरपंचाच्या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचच फुटल्याचा संशय घेऊन, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मार्कड गटाच्या लोकांसह महिला सरपंचास मारहाण केली. तरटेवाडीत जाऊन सरपंचाच्या घराची तोडफोड केली. शिवीगाळ करत दगडफेक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवारसह सीआरपी फौज दाखल झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...