आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून १८ डिसेंबर रोजी २०४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. १ लाख १ हजार ५४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तहसीलदारांनी मतदान केंद्राची पाहणी केली.
तालुक्यातील धर्माळा व आणेगाव या दोन ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तर राजेगाव, जोला या दोन ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले. शिवाय इतर ग्रामपंचायतीचे ३६ सदस्य बिनविरोध निवडून आले. आता ६४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक होत असून सरपंचाच्या ६२ जागेसाठी १७३ उमेदवार तर सदस्यपदाच्या ५२० जागेसाठी १ हजार १८४ उमेदवार रिंगणात अाहेत. शुक्रवारी ५ वाजता प्रचाराचा समारोप झाला. शनिवारी सकाळी ८ वाजेपासून मतदान केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी सर्व साहित्य ताब्यात घेऊन मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. केजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी चिंचोलीमाळी, टाकळी, मस्साजोग, दहिफळ वडमाऊली, लव्हूरी या गावात रूट मार्च काढून शक्तिप्रदर्शन केले. २०४ मतदान केंद्रावर मतदान : १८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ६४ ग्रामपंचायतीसाठी २०४ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. तर १ लाख १ हजार ५४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ५३ हजार ५२९ पुरुष आणि ४८ हजार १९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यासह बीएलओसह राखीव कर्मचारी अशा एकूण ९८२ कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार लक्ष्मण धस, नायब तहसीलदार आशा वाघ यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.